Wednesday, 13 May 2015

आर्थिकदृष्ट्या विकसित समाजाला शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय सुरक्षिततेची आवश्यकता भासू लागते.
व्यावसायिक दृष्टीकोन, परस्पर सहकार्य, शांतता, स्वच्छता, (यात आपल्या पंतप्रधानांची स्वच्छता आली)  या मार्गाने ही सुरक्षितता मिळविता येते, याची जाणीव अशा विकसित समाजाला होते.
या मार्गाने गेल्यास समाजाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, याचाही प्रत्यय त्याला येतो.
एवढेच नव्हे तर  समाजात व्यवस्था निर्माण होण्यासाठी तो समाजपुरुष समाजातील अपप्रवृत्तींनाही निरुत्साहित करतो.
थोडक्यात आर्थिक विकास हा सर्व रोगांवरील मात्रा आहे, असे वाटते.
पण हा आर्थिक विकास कसा साध्य करणार ?
ज्या समाजात शांतता, सुव्यवस्था, परस्पर सहकार्य, नीती या बाबी असतील तरच त्या समाजाचा आर्थिक विकास शक्य होईल.
थोडक्यात, दोन्ही बाबी परस्परावलंबी आहेत.

कोणते आधी आणि कसे करायचे हा एक प्रश्न आहे.